Moto G04 : नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध कंपनी Motorola ने भारतीय बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल असा किमतीत मोबाईल लाँच केला आहे. Moto G04 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला तब्बल 16GB रॅम देण्यात आली आहे. आणि तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही अवघ्या 7,999 रुपयांत खरेदी करू शकता. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात…..
6.5-इंचाचा डिस्प्ले- Moto G04
Moto G04 या मोबाईल मध्ये कंपनीने त 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्ले 90 हर्ट्झचा रिफ्रेश रेट सह येतो. स्मार्टफोनमध्ये यूनिसॉक टी606 प्रोसेसर बसवण्यात आला असून Moto चा मोबाईल Android OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो. कंपनीने हा स्मार्टफोन 4GB + 64GB मॉडेल आणि 8GB + 128GB व्हेरियन्ट मध्ये आणला आहे. मात्र वर्चुअल रॅम द्वारे हि रॅम आणखी 8 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
मोबाईलच्या कॅमेऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर, Moto G04 मध्ये LED फ्लॅशसह 16-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तसेच समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही उपलब्ध आहे. कंपनीने Moto G04 मध्ये 5 हजार mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 15W यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमत किती-
जस आम्ही तुम्हाला सांगितलं कि, मोटोG04 हा मोबाईल कंपनीने 4GB + 64GB मॉडेल आणि 8GB + 128GB व्हेरियन्ट मध्ये लाँच केला आहे. त्यानुसार, यातील 4GB + 64GB मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे तर 8GB + 128GB व्हेरियन्टची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल काळ्या, हिरव्या, निळ्या आणि केसरी रंगात खरेदी करता येणार असून येत्या 22 फेब्रुवारीपासून प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट Flipkart वर तो उपलब्ध असेल.