Moto GP वर्ल्ड चॅम्पियनशिप भारतात होणार; ‘या’ ट्रॅकवर धावणार गाड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ऑलिंपिक आणि फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर जगातील तिसरी सर्वाधिक पाहिली जाणारी क्रीडा स्पर्धा Moto GP आता भारतातही होणार आहे. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे या रेसिंग स्पर्धेचं आयोजन 2023 मध्ये होणार आहे. या चॅम्पियनशिपला ‘ग्रँड प्रिक्स भारत’ असे नाव देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

फेयरस्ट्रीट स्पोर्ट्स प्राइवेट लिमिटेड ने माद्रिद स्थित Dorna Sports SL च्या सहकार्याने MotoGP चे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. फेअरस्ट्रीट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डोरना यांच्यात 7 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. देशातील या पहिल्या मोटोजीपी स्पर्धेत 19 देशांतील रेसर सहभागी होतील.

या MotoGP स्पर्धेमुळे देशातील मोटरसायकल रेसिंग आणि त्याच्याशी संबंधित उद्योगाची व्याप्ती वाढेल. तसेच रोजगाराबरोबरच देशातील पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळणार आहे. बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे यापूर्वी फॉर्म्युला वन इंडियन ग्रांप्री 2011 ते 2013 दरम्यान आयोजन करण्यात आले होती परंतु आर्थिक, आयकर आणि नोकरशाहीच्या अडचणींमुळे ती रद्द करण्यात आली होती.