Motorola च्या ‘या’ मोबाईल वर मिळतोय बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन डे मनवले जात आहेत. यानिमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीला अनेक भेटवस्तू दिल्या जातात, तुम्ही सुद्धा यंदाच्या व्हॅलेंटाईनला आपल्या आवडत्या व्यक्तीला मोबाईल गिफ्ट म्हणून देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण Flipkart वर सध्या सुरु असंलेल्या मोबाईल बोनान्झा सेलमध्ये अनेक मोबाईल वर बम्पर डिस्काउंट ऑफर करण्यात आलेत. यामध्ये Motorola Edge 40 Neo वर जबरदस्त सूट मिळत असून तुम्ही या ऑफरचा लाभ १५ फेब्रुवारी पर्यंतच घेऊ शकता.तर मग हि ऑफर नेमकी काय आहे ते जाणून घेऊया …

काय आहे ऑफर??

Motorola Edge 40 Neo या मोबाईलची मूळ किंमत, २७,९९९ रुपये आहे. परंतु Flipkart च्या मोबाईल बोनान्झा सेलमध्ये हा मोबाईल २२,९९९ रुपयात मिळतोय. म्हणजेच सुरुवातीलाच ग्राहकांना ५००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. तुम्ही जर जुना मोबाईल एक्सचेंज करून हा मोबाईल खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्यावर सुद्धा १८,५०० रुपयांची सूट मिळेल. आणि तुम्ही हप्त्यावर मोटो चा हा मोबाईल खरेदी करणार असाल तर तुम्हाला दर महिन्याला 3,667 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Motorola Edge 40 Neo चे फीचर्स काय??

Motorola Edge 40 Neo हा अतिशय हलकाफुलका मोबाईल मध्ये त्याचे वजन केवळ 172 ग्राम आहे. या स्मार्टफोन मध्ये फुल HD+ रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 6.55-इंचाचा 10-बिट OLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 1300 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. मोबाईल मध्ये कंपनीने ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 7030 SoC प्रोसेसर बसवला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोन मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी, मोटो च्या या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी ती 68W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.