हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आघाडीच्या मोबाईल निर्माता कंपन्यांमधील एक असलेल्या motorola भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Motorola Edge 50 Neo असं या मोबाईलचे नाव असून हा हँडसेट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह बाजारात आला आहे. मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 4310mAh बॅटरी सह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा अगदी बजेट मध्ये आहे. चला तर मग मोटोच्या या स्मार्टफोनबाबत संपूर्ण डिटेल्स आज आपण जाणून घेऊयात.
6.4 इंच डिस्प्ले –
Motorola Edge 50 Neo मध्ये 20Hz रिफ्रेश रेटसह 6.4 इंचाचा pOLED AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2800nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट बसवली असून मोटोचा हा मोबाईल Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने या मोबाईल वर 5 वर्षांसाठी सेक्युरिटी अपडेट आणि 5 OS अपग्रेड दिले आहेत.
कॅमेरा – Motorola Edge 50 Neo
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola Edge 50 Neo मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP चा अल्ट्रावाइड अँगल सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सर कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी Motorola च्या या स्मार्टफोन मध्ये 4310mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 68W टर्बोपॉवर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 22,999 रुपये ठेवली आहे. हा मोबाईल Poinciana, Latte, Grisaille आणि Nautical Blue या चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल.