धमाका ऑफर!! Moto च्या मोबाईलवर 7000 रुपयांचा डिस्काउंट

Motorola Edge 60 Pro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हि आजकाल आपली जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. कुठेही जावा, तुमच्या जवळ मोबाईल तर असायलाच हवा. त्यामुळे देशात मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. मोबाईल घेत असताना स्वस्तात मस्त आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असाच मोबाईल घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तुम्ही सुद्धा नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि थोडं कन्फ्युज असाल तर तुमची चिंता आम्ही दूर करतो. आम्ही आज तुम्हाला अशा एका मोबाईल बद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला अतिशय स्वस्त किमतीत खरेदी करता येईल… तुम्ही motorola कंपनी ऐकली असेलच ना… भारतीय बाजारात motorola च्या मोबाईलने अक्षरशः मार्केट खाल्लय. आम्ही तुम्हाला याच moto मोबाईलच्या ऑफर बद्दल सांगणार आहोत. हि ऑफर नेमकी काय आहे? यातून ग्राहकांना आर्थिक फायदा कसा होतोय ते सविस्तर जाणून घेऊयात.

आम्ही तुम्हाला ज्या मोबाईल बद्दल सांगतोय तो आहे Motorola Edge 60 Pro….. प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या मोबाईल खरेदीवर १८ % म्हणजेच तब्बल ७००० रुपये सूट देण्यात आली आहे. खरं तर Motorola Edge 60 Pro ची मूळ किंमत ३६९९९ रुपये आहे, पण फ्लिपकार्टवर तो २९९९९ रुपयांवर लिस्टेड करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड द्वारे मोबाईल खरेदी केल्यास आणखी ५ % सूट तुम्हाला मिळतेय. पण सर्वात मोठा डाव तर एक्सचेंज ऑफर मध्ये आहे. तुम्ही तुमचा जुना मोबाईल देऊन हा नवा मोबाईल खरेदी केल्यास तुम्हाला तब्बल १६,३०० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळतोय. म्हणजेच काय तर Motorola चा ३६९९९ रुपयांचा मोबाईल तुम्ही अवघ्या 13,699 रुपयांत खरेदी करू शकता. परंतु याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे एक्सचेंज बोनसची किंमत हि मोबाईलच्या सध्याच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Motorola Edge 60 Pro चे फीचर्स –

Motorola Edge 60 Pro मध्ये ६.७-इंचाचा 1.5K 10-bit pOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला २७१२ x १२२० पिक्सेल रिझोल्यूशन, १२०Hz रिफ्रेश रेट, ४५०० निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. मोबाईल मध्ये ३.३५GHz ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० एक्सट्रीम ४nm प्रोसेसर बसवण्यात आला आहे. ८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅम अशा २ रॅम ऑप्शन मध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. तसेच तो अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कॅमेराच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला ५०-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ५०-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि १०-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी मोबाईल मध्ये ६०००mAh ची दमदार बॅटरी बसवण्यात आली आहे. हि बॅटरी ९०W टर्बोपॉवर आणि १५W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.