हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने भारतीय बाजारात 2 डिस्प्ले वाला फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Motorola Razr 50 असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 8GB RAM, 4200mAh बॅटरी सह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. मोटोचा हा स्मार्टफोन ऑरेंज आणि ग्रे रंगात लाँच करण्यात आला असून उद्यापासून त्याची विक्री सुरु होणार आहे. आज आपण मोटोरोलाच्या या नव्या फोल्डेबल मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Motorola Razr 50 मध्ये बाहेरील बाजूला 3.6-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे आणि आतील बाजूस 6.9-इंचाचा LTPO पोल्ड स्क्रीन आहे. 3.6-इंचाचा POLED डिस्प्लेला 1066 x 1056 पिक्सेल रिझोल्युशन मिळते तर 6.9-इंचाच्या FHD+ poled LTPO डिस्प्लेला 2640×1080 पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. या डिस्प्लेला 3 हजार निट्स पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7300X प्रोसेसर वापरला असून मोटोचा हा मोबाईल Android 14 आधारित Hello UI या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
कॅमेरा किती? Motorola Razr 50
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola Razr 50 मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 4200mAh बॅटरी उपलब्ध असून हि बॅटरी 33W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोचा हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट मध्ये आणला गेला आहे.
किंमत किती?
Motorola Razr 50 हा स्मार्टफोन 64,999 रुपयांत लाँच झाला आहे. मात्र वेगवेगळ्या बँक ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही ५० हजार रुपयांपर्यंत हा मोबाईल खरेदी करू शकता. उद्यापासून Amazon.in, Motorola.in सह ऑफलाइन स्टोअरवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. ग्राहकांना 5,000 रुपयांचा फेस्टिव्हल डिस्काउंट आणि 10,000 रुपयांची झटपट बँक सवलत मिळेल.