मौनी रॉयने दाखवली आपल्या सुंदर घराची झलक; लिव्हींग रुमपासून किचनपर्यंत सर्वकाही खास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बोल्ड लूक आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. मौनीने बिझनेसमॅन सूरज नाम्बियारसोबत गोव्यात मौनीनं लग्न केले. ती सध्या मुंबईत राहत असून तिच्या घरात लिव्हिंग रूमपासून ते किचनपर्यंत अनेक आकर्षक अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

Mouni Roy Home

अभिनेत्री मौनी रॉय अलीने अलीकडेच एक घर घेतले असून ती आपल्या घरासह एशियन पेंट्सच्या ‘व्हेअर द हार्ट इज’च्या एका भागात दिसणार आहे. ज्याचा एक व्हिडिओ आता समोर आला असून व्हिडिओमध्ये मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत तिच्या आलिशान घराची झलक दाखवण्यात आली आहे.

Asian Paints Where The Heart Is Season 6 | Mouni Roy's Home Tour Trailer

मौनीच्या नव्या आलिशान अशा मुंबईतील घरात लिव्हिंग रुममध्ये सुंदर लॅम्प, कुशन आणि मॅचिंग फर्निचरसह भिंतीची सजावट करण्यात आली आहे. शिवाय घराचा प्रत्येक कोपरा अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/ChYz1EjpzHm/?utm_source=ig_web_copy_link

मौनीच्या घरातील स्वयंपाकघरही खूप सुंदर पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहे. जे पांढ-या आणि काळ्या रंगाच्या अप्रतिम कॉम्बिनेशनने सजवण्यात आलेले आहे. घरातील दिवाणखान्यात सुंदर दिवे, कुशन आणि मॅचिंग फर्निचरसह भिंतीची सजावटही खूप सुंदर आहे. मौनीच्या घराचा प्रत्येक कोपरा शानदार दिसत आहे.

Mouni Roy Home