Mozambique Boat Sank : समुद्रात बोट पलटी होऊन 91 प्रवाशांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता .. कुठे घडली घटना??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समुद्रात बोट पलटी होऊन तब्बल ९१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक देशात घडली आहे. मोझांबिकच्या उत्तर किनाऱ्यावरजवळ बोटीचा हा भीषण अपघात (Mozambique Boat Sank) झाला. जवळपास 130 नागरिक या बोटीमध्ये होते. मात्र अचानक बोट बुडाली आणि होत्याचे नव्हते झालं. अनेक लहान बालकांसह ९१ प्रवाशांचे प्राण गेले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नौका म्हणून वापरल्या जाणाऱ्या आणि गर्दीने भरलेल्या या मासेमारी बोटीमध्ये सुमारे 130 प्रवासी होते. हे सर्वजण नामपुला प्रांतातील मोझांबिक बेटावर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतानाचा काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि बोट समुद्रात बुडाली (Mozambique Boat Sank). या अपघातात तब्बल ९१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये अनेक लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. बोट गर्दीने भरलेली होती आणि प्रवाशांना घेऊन जाण्यास अनुपयुक्त असल्याने ती बुडाली असे नामपुलाचे राज्य सचिव जेम नेटो यांनी सांगितले.

दुर्दैवी घटनेला कॉलरा जबाबदार? (Mozambique Boat Sank)

या भीषण अपघातानंतर तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी ५ जणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र बाकी लोकांचा शोध अजूनही सुरूच आहे. समुद्रात शोधमोहीम करणे अडचणीचे ठरत आहे. या दुर्दैवी घटनेला कॉलराचा अपघात जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मोजांबिकमध्ये कॉलराचा आजाराचे एकूण १५ हजारांपर्यंत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या देशातील लोक स्थलांतर करत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच काबो डेलगोडोमध्ये दहशतवाद्यांपासून जीव वाचण्यासाठी लोकांचं स्थलांतर सुरु आहे