असदुद्दिन ओवेसी यांनी औरंगाबादकरांसाठी पाठवले वैद्यकीय उपकरणे; खा.जलील यांनी केले लोकार्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी त्यांच्या वतीने हैदराबाद येथून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधी आणि कोरोना काळात उपयोगी वैद्यकीय उपकरणे पाठवले आहेत. या साहित्याचे लोकार्पण खा. इम्तियाज इम्तियाज जलील यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात करण्यात आले.

यावेळी ‘ही वैद्यकिय उपकरणे गरजू आणि गरीब जनतेसाठी वापरण्यात येतील. तसेच आम्ही एक टीम तयार केली आहे. जर गरज पडली किंवा कुणाला बेड उपलब्ध होत नसेल तर या सर्व टीमला प्रशिक्षण देऊन रुग्णांच्या घरी हि उपकरणे उपयोगात आणली जातील आणि हे सर्व साहित्य प्रायव्हेट हॉस्पिटलला दिले जाईल आणि गोर गरीब जनेतेकडून याचे पैसे घेतले जाणार नाहीत असा करार करून घेणार” अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.

हे सर्व साहित्य असुद्दिन ओवेसी यांनी खरेदी करून देशभरात ज्या-ज्या ठिकाणी एमआयएमची सत्ता आहे त्या ठिकाणी कोरोना काळात उपयोगी वैद्यकीय उपकरणे पाठवले आहेत अशी माहिती खासदार जलील यांनी दिली.
महाराष्ट्रात मालेगाव, धुळे आणि औरंगाबाद येथे हे साहित्य पाठवला आहे.

Leave a Comment