औरंगजेबाची कबर जमीनदोस्त करा; शिंदेंच्या खासदाराची संसदेत मागणी

Aurangzeb Tomb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाची कबर हा मुद्दा जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. यावर अनेकांनी आपली मते मांडून हि कबर हटवण्याची मागणी केली. पण आता औरंगजेबाची कबर जमीनदोस्त करण्याची मागणी संसदेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केली आहे. संसदेत (Parliament) हि मागणी त्यांनी 12 मार्च रोजी लोकसभेत शून्य प्रहराच्या वेळी केली.

खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले –

भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या एकूण 3,691 स्मारके व कबरींपैकी 25 टक्के वास्तू या मुघल व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावाने उभारल्या आहेत, अन या लोकांनी भारत देश, देशाची संस्कृती व परंपरेविरोधात कामे केली होती. औरंगजेबाची कबर ही त्यापैकी एक असून , त्याची कबर जमीनदोस्त करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच औरंगजेबाने आपल्या क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून सगळी हिंदू मंदिरे पाडली. अन या सर्व मंदिरातील संपत्ती लुटली. त्याचसोबतच त्याने शिखांच्या नवव्या व दहाव्या धर्मगुरूंची हत्या केली.

भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके व कबरी नष्ट –

“खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर असून ASI ने ती संरक्षित व संवर्धित केली आहे. हि कबर संरक्षित करण्याची गरज आहे का ? औरंगजेबासह भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके व कबरी नष्ट करायला हव्यात.” असे देखील खासदार नरेश म्हस्के म्हणाले

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा –

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत येण्यामागे छावा चित्रपट असून , त्यावेळी आमदार अबू आझमी यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामुळे या हा मुद्दा उफाळून निघाला आहे. भारताला गुलाम बनविणाऱ्या आणि आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांवर अत्याचार करणाऱ्यांच्या आठवणी आपण आपला वारसा म्हणून जपतो आहोत, पण हे सर्वांसाठी योग्य आहे का? असा प्रश्न म्हस्के यांनी केला आहे.