संसदेतील घुसखोरी प्रकरणाचा नागपूर अधिवेशनावर परिणाम; गॅलरी पासेस देण्यास केली बंदी

nagpur season

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज संसदेचे कामकाज सुरू असताना मध्येच दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर लोकसभेच कामकाज तातडीने थांबवण्यात आलं. तसेच आतमध्ये शिरलेल्या अज्ञात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर अधिवेशनात गॅलरी पासेस देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे कोणत्याही व्यक्तीला गॅलरी पासेस देण्यात येणार … Read more

संसदेत कामकाज सुरू असताना घडला धक्कादायक प्रकार; सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात खळबळ होणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आज संसदेचे कामकाज सुरू असताना एक तरुण अचानक आतमध्ये शिरला. यामुळे संसदेत गोंधळ उडाला. यानंतर संसद अध्यक्षांनी देखील कामकाजाला तातडीनं स्थगिती दिली. तसेच, या तरुणांना ताब्यात घेण्यात यावे, असे आदेश देण्यात आले. मात्र या सर्व घटनेमुळे संसदेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. #WATCH … Read more

महिला आरक्षणासंबंधी मोठी अपडेट!! आज होणार संसदेत विधेयक सादर

mahila aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी जुन्या संसदेच्या इमारतीला निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नवीन संसदीय इमारतीत कामकाज सुरू केले जाणार आहे. नवीन इमारतीत कामाच्या पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाची विधेयक अधिवेशनात मांडली जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे, आज अधिवेशनात कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल महिला आरक्षण विधेयक … Read more

येत्या 18 ते 22 सप्टेंबरला होणार संसदेचे विशेष अधिवेशन; मोदी सरकारची मोठी घोषणा 

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता मोदी सरकारकडून विशेष अधिवेशनाची (Special Session) घोषणा करण्यात आली आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान मोदी सरकारचे हे विशेष अधिवेशन पार पडणार आहे.  विशेष अधिवेशन पाच दिवसांचे असून याबाबतची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी ट्विट करून दिली आहे. मोदी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या … Read more

Union Budget 2023 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर; ‘या’ दिवशी सादर होणार बजेट

Parliament

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे होय. मात्र, अर्थसंकल्प कधी मांडला जाणार? त्यामध्ये नेमक्या काय तरतुदी केल्या जाणार त्यातून सर्वसामान्य लोकांना काय दिले जाणार? याची चर्चा सध्या होऊ लागली असताना केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय … Read more

देशात पुन्हा एकदा नोटबंदी? आता ‘ही’ नोट होणार बंद?

BJP Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोटबंदी हा शब्दही कानावर पडल्यास अंगाला घाम फुटतो. होय हे खरे आहे कारण लवकरच नोटबंदी होणार असून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आता 2 हजार रुपयांची नोट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांचा गुन्हेगारी कारवाया आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा आरोप … Read more

मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या कि…

Supriya Sule Mohit Kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा ट्विटद्वारे दावा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली … Read more

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ दिवसापासून सुरु होणार अधिवेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसाधारणपणे संसदेचं पावसाळी अधिवेशन दरवर्षी जुलै महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात सुरु होते. आणि ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अधिवेशन संपते. मात्र, यंदा संसदेचे अधिवेशन 18 जुलै ते 12ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार यात शंका नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशनासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीने तशी … Read more

शरद पवार – नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत प्रवीण दरेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीवरून आता राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावं भेटीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या … Read more

शरद पवार यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; दोघांमध्ये वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीकडून होत असलेल्या कारवाईवरून तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवासस्थानी सर्वपक्षीय खासदारांसह डिनर पार्टी केली. यानंतर आज पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही … Read more