खा. उदयनराजेंच राष्ट्रवादीसोबत अंडरस्टँडिंग? : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात भाष्य केले नसावं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणावर टीका करायची. त्यांनी कोणाच्या बद्दल बोलायचं ते मी सांगू शकत नाही, असा खोचक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणले, भाजप प्रवक्ते आणि राज्यपाल यांच्या विरोधात उदयनराजे आक्रमक झाले होते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात उदयनराजे यांची चुपी का?उदयनराजे भाजपवर नाराज आहेत का? राष्ट्रवादी बरोबर उदयनराजे जाणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याचाच फायदा घेत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचं वक्तव्य केल्या, नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक होते. आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी चुकीची वक्तव्य केल्यानंतर आता खासदार उदयनराजे गप्प का आहेत, असा सवाल आ.शिवेंद्रराजेंना विचारण्यात आला. त्यावर म्हणाले, नक्की उदयनराजे यांच राजकीय अंडरस्टँडिंग जर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असेल, तर मला माहित नाही म्हणत मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या महापुरुषांच्या अपमानाबाबत किंवा अफजलखान आणि‌ औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर खासदार उदयनराजे गप्प का आहेत, असा सवाल त्यांचे बंधु आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. आता साता-यातील भाजपा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्ह पाहायला मिळत असून यावर उदयनराजे नक्की काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.