MPSC तर्फे 274 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीनुसार, शासनाच्या एकूण 274 रिक्त पदासाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या 5 जानेवारी ते 25 जानेवारी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे.

प्रसिद्ध जाहिरातीनुसार, सामान्य प्रशासनात 205 जागा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 26 जागा आणि महाराष्ट्र वनसेवेत 43 जागांसाठी भरती होणार आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी आहे. तर 5 जानेवारी 2024 पासून ऑनलाइन अर्ज सुटणार आहेत. मुख्य म्हणजे, 274 पदासाठीची महाराष्ट्र राज्यसेवा राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार आहे.

पूर्व परीक्षा माहिती

25 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पात्र उमेदवारांची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी घेतली जाईल. ही परीक्षा 36 जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षा माहिती

पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारावर पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात येईल. राज्य सेवा मुख्य परीक्षा 14 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत होईल. तसेच, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 ला घेतली जाईल. तसेच महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 28 ते 31 डिसेंबर कालावधीत घेण्यात येईल.