करोनाला फाट्यावर मारत धोनीने मारली बाईकवरून रपेट; पहा व्हायरल व्हिडिओ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक संघांनी सराव सत्र बंद केला आणि खेळाडूंना घरी पाठवले. त्यामुळं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणेच घराचा रस्ता धरला.

दरम्यान, धोनीचे बाईकप्रेम सर्वश्रुत आहे. जगातल्या सर्वच बाईकचे कलेक्शन धोनीजवळ आहे. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असतांना रांचीच्या रस्त्यांवर धोनीला बाईकवर रपेट मारायला नेहमीच आवडते. धोनीच्या अशाच एका बाईक राईडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनीला गाडीवर पाहताच चाहत्यांनी त्याच्या सोबत फोटो काढण्यास सुरूवात केली.

मात्र, सर्वत्र कोरोनाच्या संसर्गाचा धोका असतांना धोनी बाईकने बाहेर पडला आहे. एका सिग्नलवर धोनी थांबला असता चाहत्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. तर काहींनी सेल्फी घेतले. जसा सिग्नल सुरू झाला धोनीने चलो, चलो,चलो म्हणून गाडी सुरू केली. धोनीचा हा व्हिडिओ सध्या टिकटॉकवर वेगाने व्हायरल होत आहे. @srsorif01 या युझरने धोनीचा व्हिडिओ शेअर केला असून त्याला ६ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६६ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.