MS Dhoni Catch : माही है तो मुमकिन है!! धोनीच्या अप्रतिम कॅचने वेधले क्रिकेटविश्वाचे लक्ष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी!! नावातच वजन आहे. देशभरात धोनीचे करोडो चाहते आहेत. धोनीला फक्त बघायचा प्रेक्षक मोठ्या प्रमाणात स्टेडियमवर येतात. सध्या आयपीएल मध्येही चेन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक सामन्यात धोनी धोनी चा नारा आपल्याला पाहायला मिळतो. आत्तापर्यंत चेन्नईचे २ सामने झाले असून या दोन्ही सामन्यात धोनी फलंदाजीला आलेला नसला तरी कालच्या गुजरात विरुद्धच्या सामन्यात धोनीने एक अप्रतिम झेल (MS Dhoni Catch) टिपत चाहत्यांना खुश केलं आहे.

धोनीचा फिटनेस वाखाणण्याजोगा – (MS Dhoni Catch)

गुजरातच्या डावाच्या ८ व्या षटकात विजय शंकर फलनादी करत होता, तर समोर चेन्नईच्या डार्लि मिचेलच्या हातात बॉल होता. त्यावेळी डार्लिचा ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणार बॉल विजय शंकरच्या बॅटला लागून मागे गेला आणि धोनीने उजव्या बाजूला झेप घेऊन एक शानदार कॅच पकडला. वास्तविक आपण बघितलं तर हा झेल सोप्पा नक्कीच नव्हता, परंतु माही है तो मुमकिन है!! याची प्रचिती पुन्हा एकदा आली. महत्वाची बाब म्हणजे सध्या धोनीचे वय ४२ वर्ष आहे, या वयातही त्याची चपळता आणि फिटनेस वाखाणण्याजोगी आहे. धोनीने टिपलेला या अप्रतिम झेलमुळे (MS Dhoni Catch) चेन्नईच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सोशल मीडियावर धोनीच्या कॅचला विडिओ जोरात व्हायरल होत आहे.

दरम्यान, काल चेन्नई सुपर किंग्सने चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना 63 धावांनी जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमावून 206 धावा केल्या. विजयासाठी 207 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या संघाला 20 षटकात 148 धावाच करता आल्या. २४ चेंडूत ५१ धावांची तडाखेबंद खेळी करणाऱ्या शिवम दुबेला सामनावीर पुरस्कार मिळाला.