धोनीसाठी कायपण!! मुलांच्या शाळेची फी थकवली, अन 64 हजार रुपये खर्च करून थेट स्टेडियम गाठलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात आयपीएलचा (IPL 2024) माहौल असून आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी चाहते सरसावत आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय खेळाडू ठरतो तो म्हणजे महेंद्रसिंघ धोनी… आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन कित्येक वर्षे झाली असली तरी धोनीची (MS Dhoni) क्रेज अजूनही तशीच कायम आहे. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी फक्त धोनीला पाहण्यासाठी आणि त्याच्या फलंदाजीचा आनंद घेण्यासाठी स्टेडियम खचाखच भरलेलं पाहायला मिळते. संपूर्ण देशात धोनीचे करोडो चाहते आहेत. त्यातील असाच एक चाहता आहे ज्याने चक्क आपल्या मुलांच्या शाळेची फी थकवून धोनीला पाहण्यासाठी तब्बल ६४ हजार रुपये खर्च केले आणि स्टेडियम गाठले ….

धोनीच्या या जबरी फॅनचे नाव समोर आलं नसलं तरी त्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हा धोनीचा चाहता सांगतोय कि,तिकीट मिळत नव्हते, त्यामुळे त्याने जास्तीचे पैसे खर्च करून तिकीट खरेदी केले. यासाठी त्याला ६४ हजार रूपये द्यावे लागले. पण, त्याने मुलीच्या शाळेची फी न भरता ते पैसे सामना पाहण्यासाठी खर्च केले. आपण फक्त महेंद्रसिंग धोनीची झलक पाहण्यासाठी एव्हडा सगळा खटाटोप केला असेही त्याने सांगितलं. मात्र अनेकांनी त्यांच्या या निर्णयाला चुकीचे म्हणत सामन्यासाठी शाळेची फी थकवल्याने टीका केली.

दरम्यान, महेंद्रसिंघ धोनीने यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कर्णधारपदाचा राजीनामा देत आपल्या चाहत्यांना जबर धक्का दिला होता. धोनीच्या या निर्णयामुळे यंदाची आयपीएल ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची आयपीएल असेल असेही बोललं जात आहे. त्यामुळे आपल्या या लाडक्या कॅप्टन कुलला पाहण्यासाठी, त्याच्या आक्रमक फटकेबाजीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते आणि क्रिकेटप्रेमी स्टेडियमवर उपस्थिती लावत आहेत.