व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

MS धोनी रुग्णालयात दाखल होणार? नेमकं झालं काय? चाहत्यांमध्ये चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा दणदणीत पराभव करून पाचव्यांदा आयपीएलवर आपलं नाव कोरल. चेन्नईचे चाहते या विजयाचा आनंद अजूनही साजरे करत असतानाच दुसरीकडे धोनीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांच्या काळजी वाढली आहे. धोनी लवकरच रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. धोनीच्या गुडघ्याची दुखापत खूप गंभीर असून त्यामुळेच त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावं लागण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्रसिंग धोनीला गुडघ्याचा त्रास असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात जावे लागू शकते. गुडघ्याच्या चाचणीसाठी धोनी कोकिलाबेन रुग्णालयात जाईल. धोनी या आठवड्यात मुंबईला जाऊ शकतो. IPL 2023 दरम्यान अनेकदा धोनीला गुडघ्याचा त्रास झालेला दिसला. अंतिम सामना जिंकल्यानंतर चेन्नई संघ सेलिब्रेशन करत असताना धोनीच्या गुडघ्याला पट्टा बांधलेला दिसत होता. त्यामुळे चाहत्यांची काळजी वाढली होती.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने काल रात्री गुजरात टायटन्सचा 5 विकेटने पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरल. अंतिम २ चेंडूवर रवींद्र जडेजाने सिक्स आणि फोर मारून चेन्नईला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. चेन्नईने आत्तापर्यंत 2010, 2011, 2018 आणि 2021 आणि 2023 मध्ये आईपीएल चषक जिंकला. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघानी आत्तापर्यंत 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.