पुणे | सुनिल शेवरे
वीज उद्योगातील कामगारांना समान काम, समान वेतन मिळावे, कंत्राटदारांकडून होणारी कामगारांची पिळवणूक थांबावी यासाठी पूर्वाश्रमिच्या एम्एसइबी मधील रोजंदारी पद्धत व एनएम्आर पुन्हा सुरु केले पाहिजे. या मागणीसाठी अधिवेशनाच आयोजन करण्यात आलं आहे.
दिनांक ७ सप्टें २०१८ रोजी सकाळी १०:३० वाजता दुधाने लॉन्स, कमिन्स कॉलेज रोड, शाहू कॉलनी , कर्वेनगर येथे हे अधिवेशन संपन्न होणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश संघटक नीलेश खरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कंत्राटी वीज कामगारांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी लढ़ा देण्यासाठी गेली अनेक वर्षे काम करणारी म्हणून या कामगार संघाची ओळख आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून या अधिवेशनाला मार्गदर्शन महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे करणार आहेत. व कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा आमदार मेधा कुलकर्णी आहेत.