खुशखबर ! दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द ;ST महामंडळाचा दिलासादायक निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच या सणानिमित्त अनेक जण आपल्या आप्तेष्टांची भेट घेत असतात. त्यामुळे रेल्वे आणि बसेस ना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हीच गर्दी लक्षात घेता रेल्वे आणि बसेस यांच्या विभागाकडून ज्यादा गाड्या देखील सोडल्या जातात मात्र प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बाब आता समोर आली आहे.

एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली दहा टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे दिवाळीच्या निमित्ताने एसटी महामंडळाकडून दरवर्षी दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर यादरम्यान एका महिन्यासाठी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. एसटी महामंडळाने ही भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीने राज्यभरामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ST च्या योजनांमुळे प्रवाशांना दिलासा

एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक बसेस सुद्धा दाखल झाल्या आहेत. याशिवाय ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, शिवाय महिलांना अर्ध्या तिकीटामध्ये एसटी महामंडळाकडून प्रवास उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. दिवाळीच्या सणानिमित्त एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ केली जाते त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम आता महामंडळाला मिळणार नाही. मात्र प्रवाशांकरिता ही बाब दिलासादायक असून प्रवाशांना जादाचे पैसे मोजावे लागणार नाहीत.

कोणत्या ST ला होती भाडेवाढ ?

यंदाच्या वर्षी 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं होतं एसटीची प्रस्तावित दहा टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निम आरामी बसेस साठी लागू होती. मात्र ते भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती

प्रवाशांना दिलासा

सध्याचा विचार करता दिवसाला 23 ते 24 कोटी रुपयांचं उत्पन्न एसटी महामंडळाला मिळतं हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पन्न सहा कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला 950 एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. एसटी महामंडळाने 10% भाडेवाढचा निर्णय रद्द केल्यामुळे एसटी खात्याला जरी तोटा होणार असला तरी प्रवाशांना मात्र ही बाब दिलासादायक आहे. कारण या गर्दीच्या काळामध्ये अनेक खाजगी बसेस द्वारे अव्वाच्या सव्वा रक्कम प्रवाशांकडून आकारली जाते आणि त्यामुळे प्रवाशांची लूट होते ही लूट वाचली जाणार आहे.