MSRTC : बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर उद्यापासून सुरू करणार ई-बस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MSRTC : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRTC) बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर 20 इलेक्ट्रिक बसेस जोडल्या जाणार आहेत. या बसेस पर्यावरणपूरक असतील. मुख्यमंत्री एककांत शिंदे बसेसला हिरवी झेंडी दाखवतील. बसची आसनक्षमता 35 प्रवाशांची आहे. ही बस नऊ मीटर लांबीची असून, शिवाई बसपेक्षा थोडी वेगळी आहे. एका चार्जिंगवर साधारण 200 किलोमीटर अंतर ही बस पार करेल.

173 थांब्यांवर चार्जिंग स्टेशन्स (MSRTC)

बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गासाठी (MSRTC) ने 5,150 वातानुकूलित ई-बस वेट लीजवर दिल्या आहेत, 20 बस ताफ्यात समाविष्ट केल्या आहेत. महामंडळाने अखंडित सेवा सुनिश्चित करण्यासाठी 173 हून अधिक बस थांब्यांवर ई-बस चार्जिंग स्टेशन्स देखील स्थापित केली आहेत.

कुठे मिळतील तिकिटे ?

या ई-बसची तिकिटे http://www.msrtc.maharashtra.gov.in किंवा (MSRTC) मोबाइल आरक्षण ॲपवरून बुक करता येतील. मुंबई ते नाशिक सेवा 13 फेब्रुवारीपासून सुरू होईल, नाशिक ते मुंबई परतीचा प्रवास 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

एमएसआरटीसी महाराष्ट्रातील दुर्गम भागात बस चालवते आणि इतर राज्यांमध्येही काही सेवा चालवते. 15,945 बसेसच्या ताफ्यासह, MSRTC दररोज अंदाजे 53 लाख प्रवाशांना सेवा देते.