MSRTC : घरबसल्या कळणार ‘लालपरीचे लाईव्ह लोकेशन’ ; गाडयांना बसवण्यात आली VTS सिस्टीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MSRTC : आजही गाव खेड्यातील माणसांना जोडून ठेवणारा घटक म्हणजे आपली ‘लालपरी’. काळाच्या ओघात लालपरी सुद्धा आधुनिक झाली आहे. लाल परीने आपलं रुपडं देखील पालटलं असून आता ST स्टॅन्ड वर मस्त थंडगार AC गाड्या सुद्धा उपलब्ध आहेत. आता त्यात आणखी एक भर म्हणून ST महामंडळाच्या माध्यमातून नवीन ऍप विकसित करण्यात आले असून या ऍपद्वारे तुम्हाला तुमच्या ST (MSRTC) बाबत सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे.

व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप (MSRTC)

राज्यातील जवळपास 50 मार्गांवर ST च्या फेऱ्या होतात. मात्र काही कारणास्तव ST ला उशीर होतो त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. मात्र या समस्येवर ST महामंडळाकडून तोडगा काढण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप आणले आहे.

बसची वेळ 24 तास अगोदर कळणार

VLT च्या माध्यमातून प्रवाशांना एसटीचे थांबे, बस स्थानकात बस किती वाजता येणार हे 24 तास अगोदर कळेल. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाईलवर कळेल. त्यासाठी एसटी तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून प्रवाशांना बस स्थानकात (MSRTC) एसटी किती वाजता येणार हे कळेल. एसटीच्या ताफ्यातील सर्वच बसेसला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या ॲपच्या माध्यमातून बसची सध्यस्थिती, लोकेशन कळेल.

अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना (MSRTC)

मिळालेल्या माहितीनुसार सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्नमधील बदल, त्यामध्ये इंटिग्रेट करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही आठवड्यात हे काम पूर्णत्वास येणार आहे. एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट काढल्यावर त्यावरील ट्रिप कोड, एसटीच्या ॲप्लिकेशनमध्ये (MSRTC) ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन प्रवाशांना समजेल. मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात त्यासाठी अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.