इन्स्टाग्रामवर स्वतःचे व्हिडिओ अपलोड करणं लेडी कंडक्टरला पडले महागात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – स्वतःचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका लेडी कंडक्टरला महागात (suspend lady conductor) पडले आहे. या लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित (suspend lady conductor) केले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत हि कारवाई करण्यात आली आहे. मंगल गिरी असे या लेडी कंडक्टरचे नाव आहे. त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर म्हणून नोकरीस आहे. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
मंगल गिरी यांचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांना कामावरून निलंबित करण्यात आलं आहे. एवढेच नाहीतर तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही एसटी महामंडळाकडून निलंबित (suspend lady conductor) करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाविरोधात सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

हे निलंबन करताना एसटी विभागाने फक्त डेपोमधील बोर्डवर नोटीस लटकवली आहे. त्यात निलंबन (suspend lady conductor) का केले? याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच मी एसटीच्या विरोधात काहीच केले नसून केवळ माझी बदनामी करण्यासाठीच हा प्रकार केला असल्याचा आरोप मंगल गिरी यांनी केला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय