MSRTC : साताऱ्यातून लालपरी होणार कालबाह्य ! MSRTC चा महत्वपूर्ण निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MSRTC : महाराष्ट्राची शान असलेली ‘लालपरी’ राज्याच्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या प्रवाशांकरिता आजही वरदान आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीला आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. हेच नुकसान भरून काढण्यासाठी MSRTC ने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून साताऱ्यात इलेक्ट्रिक बसेसची सुरुवात करण्यात आली आहे. साताऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नव्या ई बसेसची सेवा सुरू करण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती मात्र आता प्रवाशांची प्रतीक्षा संपुष्टात आली असून सातारा जिल्ह्यामध्ये इ बसेस दाखल झाल्या (MSRTC) आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या बसेस या पूर्णपणे वातानुकूलित यंत्रणांच्या असणार आहेत त्यामुळे सातारकरांचा प्रवास आता थंडगार आणि आणखी सुखद होणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एम एस आर टी सी कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वातानुकूलित असण्याबरोबरच या बसेस (MSRTC) ऑटोमॅटिक सुद्धा आहेत.

सातारातील एसटी स्टँड मध्ये पहिल्या टप्प्यात पाच गाड्या दाखल झाल्या असून एसटी महामंडळाच्या आवारात ई-बस साठी आवश्यक असणारी चार्जिंग पॉइंट ची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे. या गाड्यांची प्रवासी संख्या जवळपास 35 इतकी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये प्रवाशांचा प्रतिसाद पाहता गाड्यांची संख्या वाढवण्यात देखील येणार आहे. या गाड्या पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे इंधनाचा खर्चही कमी (MSRTC) होणार आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सातारा मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लाल पोरीचा गोंधळ समोर येत होता. गाड्यांची अस्वच्छता, अनेक गाड्या मोडकळीस आलेल्या होत्या, शिवाय काही गाड्या ह्या मध्येच बंद पडत होत्या त्यामुळे प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती. याचा परिणाम सातारा जिल्ह्यातून होणाऱ्या एम एस आर टी सी च्या आर्थिक स्थिती वर होत होता. म्हणूनच ही आर्थिक दरी भरून काढण्यासाठी (MSRTC) साताऱ्यामध्ये इलेक्ट्रिक बसेसची सुरुवात करण्यात आली आहे.