खाऊगल्ल्ली | मुगाचा हलवा हा पौष्टिक पदार्थ आहे. तसेच यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.
साहित्य –
१) २ वाट्या साखर
२) २ वाट्या मूगाची डाळ
३) २ वाट्या दूध
४) २ वाट्या तूप
५) अर्धा चमचा वेलदोडे पावडर
६) काजू-बेदाणे-पिस्ते
कृती –
मूगाची डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. चार तासानंतर डाळीतील पाणी काढून घ्या. पाणी पूर्ण काढल्यावर डाळ मिक्समधून वाटून घ्या.
वेलदोड्याची पूड करून घ्या. काजू उभे चिरून घ्या. बदाम पाण्यात भिजत घालून साल काढून उभे काप करा.
कढईत तूप घेऊन त्यावर वाटलेली मूगाची डाळ घालावी व तांबूस होईपर्यंत परतावी. तांबूस झाल्यावर बाजूला ठेवा.
दुसरीकडे दूध-साखर एकत्र करून दुधाला उकळी आणा. ते दूध डाळीवर ओतून डाळ चांगली परतून घ्या. गॅस मंद ठेवून सारखे परतत राहावे. वेलची पूड घाला व दूध पूर्ण आटल्यानंतर बदाम, काजू घालून खाली उतरवा.
इतर महत्वाचे –