‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांचा पुन्हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी चित्रपट सृष्टीतील 90 च्या दशकातील नावाजलेले अभिनेते मुकेश खन्ना हे शक्तिमान या हिंदी लोकप्रिय शोच्या माध्यमातून घराघरात पोहचले. मुलांचे सुपरहिरो मुकेश खन्ना नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. ते काही नाही काही त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. आता त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. “जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वतःहून शरीरसंबंधांसाठी विचारत असेल तर ती मुलगी असभ्य आहे. ती मुलगी, एक मुलगी नाही तर ती धंदा करणारी आहे, असा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

https://www.instagram.com/reel/ChB-bFhF6Sn/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात त्यांनी म्हंटले आहे की, जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वतःहून शरीरसंबंधांसाठी विचारत असेल तर ती मुलगी असभ्य आहे. ती मुलगी, एक मुलगी नाही तर ती धंदा करणारी आहे. कारण अशा निर्लज्जपणाच्या गोष्टी सभ्य समाजातील कोणतीही मुलगी करणार नाही आणि जर ती करत असेल ती असभ्य आहे, असं करणं हा तिचा व्यवसाय आहे. यात तुम्ही सहभागी होऊ नका.

सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी खूप संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मुकेश खन्ना यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी खन्नांना सुनावलेही आहे.