Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | बँकसीडींग अभावी 44 हजार बहिणीचे पैसे अडकले; बँकांबाहेर महिलांच्या मोठ्या रांगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आपले राज्य सरकार विविध योजना आणत असतात. आणि या योजनांमध्ये सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवलेले आहे. जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 हजार रुपये देण्याचे देखील त्यांनी सांगितले होते. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते जमा झाले होते. परंतु दिवाळी तोंडावर असताना सरकारने महिलांना पुन्हा एकदा बोनस गिफ्ट दिलेले आहे. ते म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये सरकारने दिवाळीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत अनेक महिलांच्या खातात हे 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत.

परंतु जुलै महिन्यात अर्ज करूनही अद्याप अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही. याचे कारण म्हणजे आधार सिडींग. अनेक महिलांच्या आधार सिडींग नसल्याने खात्यात पैसे आलेले नाही. गेल्या महिन्यापासून महिलांनी केवायसी आणि आधार सिडींगसाठी अर्ज केले होते. परंतु सर्वर डाऊनमुळे महिलांच्या शेडिंग होत नसल्याने बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ चालू झालेला आहे. आणि यामुळे महिलांचे लाडके बहीण योजनेचे पैसे देखील खात्यात येत नाही.

अनेक महिलांचे लाडके बहिण योजनेचे (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) अर्ज स्वीकारले गेलेले आहेत. परंतु त्यांचे बँक खाते आधार कार्ड सीडींग नसल्यामुळे पैसे खात्यात येण्यास अडचणी होत आहेत. अनेक महिलांना 7500 हजार रुपये बँकेत जमा झाल्याचे मेसेज देखील येत आहेत. परंतु त्यांना ते काढता येत नाही. त्यामुळे बँकांमध्ये देखील महिलांची गर्दीला झालेली दिसत आहे. आणि बँकेतच वाद चालू झालेले आहे. अकोला जिल्ह्यामधील लाडकी बहीण योजनेचे 4 लाख 43 हजार 388 अर्ज केले होते. त्यातील 4 लाख 35 हजार 857 महिला पात्र ठरलेल्या आहेत तर 1769 अर्ज बाद झालेले आहेत. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा. यासाठी सरकारने अर्ज करण्याची तारीख ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढून दिलेली होती. तसेच निकष देखील कमी केलेले होते. परंतु आता अर्ज करण्याची तारीख देखील संपलेली आहे.