Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून या विधानसभेच्या आधी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या योजनेचे अर्ज प्रक्रिया देखील गेल्या महिन्यांपासून सुरू झालेली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
अनेक महिलांना 14 ऑगस्टपासून या योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झालेली आहे. अनेक महिन्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे देखील जमा झालेले आहेत. 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहेत. परंतु अनेक महिलांना या योजनेचा लाभ देण्यामध्ये अडचणी निर्माण झालेले आहेत. अनेक महिलांचे आधार क्रमांक आणि त्यांचे बँक खाते एकमेकांची लिंक नसल्याने ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे.
त्यामुळे तुम्ही जर या योजनेचा अर्ज केला असेल, तर तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. तसेच कोणते बँक खाते आधार कार्डची लिंक आहे. हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. आता त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेऊया.
तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना त्या अर्जामध्ये बँकेचा खाते क्रमांक जो दिला आहे. तो तुमच्या आधार क्रमांक अशी लिंक आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. तुमचे जर आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही जरी या योजनेसाठी पात्र असाल, तरी देखील तुम्हाला ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमची बँक सीडींग स्टेटस जाणून घेणे आणि बँक खाते आधार क्रमांकला लिंक करणे खूप गरजेचे आहे.
अशाप्रकारे चेक करा बँक खाते आणि आधार क्रमांक लिंकचे स्टेटस | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana
- तुम्हाला जर बँक सीडींग स्टेटस टाक तपासायचे असेल, तर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला हवी ती भाषा निवडायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला आधार सर्विस हा पर्याय दिसत आहे.
- पर्यावर क्लिक करून तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस हा पर्याय दिसेल.
- हा पर्याय दिसल्यावर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल.
- त्यावर बँक शेडिंग स्टेटस हा पर्याय देखील दिसेल.
- त्यानंतर त्या क्रमांकावर क्लिक करावे आणि तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेल्या कॅपचा कोड टाकून लॉगिन करावे.
- त्यानंतर आधार कार्ड सिलिंग असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल हा ओटीपी तुम्ही त्या वेबसाईटवर टाकावा त्यानंतर लॉगिन होईल.
- यानंतर तुमचे बँक सीडींग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकशी कोणते बँक खाते लिंक आहे हे देखील तुम्हाला लगेच समजेल.