Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | मागील महिन्यात राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) सुरू केली. या योजनेची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याच योजनेची चर्चा चालू आहे. गेल्या एक महिन्यात या योजनेसाठी जवळपास लाखो महिलांनी अर्ज केलेले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि दुर्बल महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. अनेक लोकांनी या योजनेचा अर्ज केलाय. परंतु पुढेच आपल्या अर्जाचे काय झाले? आपला अर्ज मंजूर झालाय की नाही?हे अजूनही अनेक लोकांना माहीत नाही. तर आज आपण तुमचा अर्जाची स्थिती नक्की काय आहे हे जाणून घेणार आहोत.
तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअर वरून नारीशक्ती ॲप डाऊनलोड करावा लागेल. यामधून तुम्ही योजनेचा फॉर्म भरू शकता. परंतु या ॲपवर सध्या अनेक तांत्रिक अडचणी येत आहे. यामुळे तुम्ही वेबसाईटवर जाऊन देखील हा अर्ज करू शकता. अगदी काही मिनिटातच हा अर्ज भरून होईल.
फॉर्मची स्टेटस कसे चेक कराल ? | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana
- यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी नारीशक्ती दूध ॲप उघडायचा आहे त्यानंतर त्या लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- तुमच्या अकाउंट लॉगिन होईल आणि लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी व्हेरिफाय करायचा आहे.
- यानंतर तुम्ही मेन मेनूमध्ये यापूर्वी केलेले अर्ज असा पर्याय दिसेल त्या अर्जावर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्टेटस पाहू शकता.
- अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही
अर्जाचा फॉर्म मंजूर झाला आहे की नाही ?
- या मेनूमध्ये जर तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिट असे दाखवत असेल, तर यावेळी तुमचा अर्ज भरला जात आहे असे आहे.
- त्यानंतर तुम्हाला Approve असा पर्याय दिसत असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला गेलेला आहे.
- त्यानंतर जर In review असे दिसत असेल तर तुमच्या अर्जाचे अर्जाची तपासणी चालू आहे .
- जर तुम्हाला Rejected असा दिसत असेल तर तुमचा अर्ज नाकारलेला आहे असा अर्थ होतो.
अर्ज करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्र
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- आय प्रमाणपत्र
- शिधापत्रिका
- पासपोर्ट आकाराचा फोटो