Mukhyamantri Yojana Doot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; दरमहा मिळेल 10 हजार रुपये मानधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mukhyamantri Yojana Doot | सरकारकडून सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. सामान्य नागरिकांच्या हिताचा आणि भवितव्याचा विचार करूनच विविध योजना सरकारमार्फत आणल्या जातात. आता याच योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना करून देण्यासाठी आणि त्यांची माहिती लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सरकारने एक मुख्यमंत्री योजना उपक्रम सुरू केलेला आहे. आणि ज्या लोकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. म्हणजे सरकारच्या ज्या काही योजना आहेत, त्यांची माहिती हे लोक त्यांच्या परिसरातील लोकांना देतील. आता या उपक्रमाचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे आज म्हणजे शुक्रवार 13 सप्टेंबर ही या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याकडून अर्ज लवकरात लवकर अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

ही योजना महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालना मार्फत राबविण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत पातळीवर 1000 तर शहरी भागात प्रत्येक 5000 लोकसंख्येमागे अशा पद्धतीने राज्यात 50 हजार योजनादुतांची 6 महिन्यासाठी निवड केली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजना दुतांना (Mukhyamantri yojana doot) दर महिन्याला 10 हजार रुपये एवढे मानधन देखील दिले जाणार आहे. हे योजनादूत सामान्य नागरिकांना सरकारच्या कल्याणकारी योजनाबद्दल माहिती देतील. या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे.

उपक्रमात सहभाग घेण्यासाठी पात्रता |Mukhyamantri Yojana Doot

  • या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 35 दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे त्या व्यक्तीकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराला बेसिक संगणक ज्ञान असावे.
  • उमेदवाराकडे स्वतःचा स्मार्टफोन असावा.

मुख्यमंत्री योजना दुत उपक्रमासाठी लागणारी कागदपत्र |Mukhyamantri yojana doot

या उपक्रमासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे त्याच्या आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असलेले कागदपत्र, तसेच अधिवास दाखला, बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा