Mukhymantri Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची मुदतवाढ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीचा विचार करता राज्य सरकार अनेक योजना आणत आहेत. आणि महिलांना याचा जास्त फायदा देत आहे. अशातच राज्य सरकारने जुलै महिनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये ऍडव्हान्स मध्ये महिलांना मिळालेले आहेत.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदतवाढ केलेली आहे. आणि आता अखेरची मुदतवाढ देखील सरकारकडून करण्यात आलेली आहे. या आधी सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ केली होती. परंतु आता काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने सरकारने 15 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्यांनी 15 ऑक्टोबर आधीच अर्ज 2024 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत महिलांना या लाडके बहिणी योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. परंतु यावेळी हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने न स्वीकारता अंगणवाडी सेविकांमार्फतच स्वीकारले जाणार आहेत.

सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) केलेली ही तिसरी मुदतवाढ आहे. या आधी सरकारने 15 जुलै पर्यंत मुदतवाढ केली होती. परंतु योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली. तरी देखील अनेक महिलांनी अर्ज केलेले नव्हते .त्यामुळे ही मुदतवाढ 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली. आणि आता 15 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची मुदतवाल करण्यात आलेली आहे.

अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र ? | Mukhymantri Ladaki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना त्यांचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, उमेदवाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो हे कागदपत्र द्यावे.

अर्ज करताना कोणत्या अटी आहेत ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. तसेच जर महिन्याचा जन्म इतर राज्यात झालेला असेल, आणि तिचा पती जर महाराष्ट्रातील असेल, तरी देखील ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. तसेच अविवाहित घटस्फोटीत विधवा आणि महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे बँक खाते असणे गरजेचे आहे. तसेच महिलेचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे असते.