Mukhymantri Ladaki Bahin Yojana | महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत. याचा फायदा सगळ्यांनाच झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेची संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि ही योजना अगदी काही दिवसातच खूप लोकप्रिय झाली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकारकडून देण्यात आले होते. परंतु विरोधकांनी या योजनेवर अनेक टीका देखील केल्या.
विधानसभा निवडणुकीचा विचार करून मत मिळवण्यासाठी सरकारने ही योजना आणली असल्याचा आरोप देखील सरकारवर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला अपयश मिळाले म्हणून ही योजना चालू केली आहे. असे विरोधकांचे म्हणणे होते. परंतु महायुती सरकारने हे सगळे आरोप नेहमीच खोडून काढलेले आहेत.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांना मुलाखत देताना म्हणाले की, “लाडकी बहीण योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात चालवली जाऊ शकते, असे विरोधकांना वाटले नव्हतं. आणि त्यांच्यासाठी हे खूप अनपेक्षित होते. लाडकी बहिण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आलेले आहे. 20 नोव्हेंबरला निवडणूकचे मतदान आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबर मध्ये देण्यात येणार आहे.”
आत्तापर्यंत या लाडक्या बहिणी (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आतापर्यंत एकूण 7500 हजार महिलांना मिळालेले आहेत. परंतु आचारसंहिता आल्याने आता पुढे या योजनेचे काय होणार? त्याचप्रमाणे सरकार निवडून आल्यावर देखील ही योजना चालू राहील का? असे अनेक प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनात आहे. परंतु आता निवडणुकीचा निकाल लागल्यावरच या योजनेचे नक्की करून काय होईल हे ठरेल.