Friday, January 27, 2023

Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

- Advertisement -

पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या दीड महिन्यापासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक मागील काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.