औरंगाबाद | मुकुंदवाडी पोलिसांनी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नातेवाईकांसाठी रक्त आणण्यासाठी निघालेल्या मजुराला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान मुकुंदवाडी भागातील राजनगर, झेंडा चौकात घडला. रमेश काळे ( 23, रा. मूर्तिजापूर ) असे जखमी मजुरांचे नाव आहे. रात्री मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी जाब घेतली होती
. काळे यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
हाती आलेल्या माहितीनुसार, रमेश काळे हे सुतारकीचे काम करतात. विश्वकर्मा समाज संघटनेची ते कार्यरत आहेत. सोमवारी काळे हे जवाहरनगर भागातील ब्लड बँकेकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. राजनगर झेंडा चौकात ते आले. सध्या दुपारी 4 नंतर संचार बंदीचे आदेश लागू असल्याचे तेथे काही पोलीस कर्मचारी नाकाबंदीसाठी उभे होते. त्याच वेळी तीन तरुणांच्या मागे काही पोलिस कर्मचारी धावत होते. तेवढ्यातच सीबी ड्रेसवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने काळे यांच्या दिशेने धाव घेत त्यांना कठीण बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यात ते गंभीर जखमी झाले.
दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने त्यांची विचारपूस केली त्यानंतर काळे घराकडे परत आले. त्याने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला मारहाणीनंतर झालेल्या जखमा पाहून कुटुंबीय भयभीत झाले. त्यानंतर सायंकाळी कुटुंबीय व अन्य नातेवाईक ठाण्यात गेले. मारहाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली ठाणे प्रमुखाने काळे यांच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काळे यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.