हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला कमी पैशात जास्त नफा मिळवण्याची ईच्छा असते. त्यासाठी तर हर प्रकारे प्रयत्न करत असतात. याच कारणासाठी अनेक गुंतवणूकदार चांगला रिटर्न देण्याची क्षमता असलेल्या पेनी स्टॉकवर लक्ष ठेऊन असतात. मार्केटमध्ये असे अनेक पेनी स्टॉक आहेत ज्यांची किंमत 10 रुपयांच्या खाली आहे. यामध्ये आपल्याला अगदी थोडे पैसे गुंतवून जास्त शेअर्सची खरेदी करता येईल. मात्र, यामध्ये कधी आणि कोणता स्टॉक वर जाईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही.
आज आपण एकेकाळी पेनी स्टॉक असणाऱ्या आणि सध्या 2,000 रुपयांच्या जवळ किंमत असणाऱ्या Deepak Nitrite च्या शेअर्स बाबतची माहिती जाणून घेणार आहोत. आतापर्यंत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 95000 टक्के रिटर्न दिला आहे. 1995 मध्ये BSE वर लिस्टेड झालेल्या या शेअर्स मधून आणखी चांगले रिटर्न मिळण्याची अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. Multibagger Stock
BSE वर 10 ऑगस्ट 2001 रोजी Deepak Nitrite च्या शेअर्सची किंमत 1.96 रुपये होती. तर 29 जुलै 2022 रोजी या शेअर्सची किंमत 1915 रुपयांवर आली आहे. जर कोणी 10 ऑगस्ट 2001 रोजी Deepak Nitrite च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते अजूनपर्यंत ठेवले असतील तर आज त्याची रक्कम 9.75 कोटी रुपये झाली असेल. गेल्या 5 वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,020 रुपये आहे. याक्षणी ते आपल्या 52 आठवड्यांच्या 1681 रुपयांच्या नीचांकी पातळी जवळ आहे. त्यामुळे त्यामध्ये आता आणखी वेग येईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शुक्रवारी या शेअर्समध्ये 12 रुपयांची वाढी झाली. Multibagger Stock
एकीकडे भारतीय बाजारातून परकीय गुंतवणूकदार पैसे काढून घेत असताना Deepak Nitrite ने त्यांना आपल्याकडे वळवले आहे. 31 मार्चपर्यंत यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा 8.76 टक्के होता, जो 11 जुलैपर्यंत वाढून 9.07 टक्के झाला आहे. याशिवाय LIC ने देखल Deepak Nitrite मधील आपला हिस्सा 4.6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. Multibagger Stock
BSE वर 14 सप्टेंबर 2012 रोजी Deepak Nitrite चे शेअर्स 17.19 रुपयांच्या पातळीवर होते. या कंपनीच्या शेअर्सनी 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 10,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने त्यावेळेस Deepak Nitrite च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असेल तर आज त्याला 1 कोटींहून जास्त रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.godeepak.com/
हे पण वाचा :
Multibagger Stocks : गेल्या आठवड्यात ‘या’ 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मजबूत नफा !!!
Bank Holidays : बँकांना ऑगस्टमध्ये असणार 17 दिवस सुट्टी, सुट्ट्यांची लिस्ट तपासा
बँकेच्या ATM द्वारे घरबसल्या दरमहा कमवा हजारो रुपये !!!
HDFC च्या ग्राहकांना धक्का !!! कंपनीचे होम लोन महागले
Changes from 1 August : ऑगस्ट महिन्यात होणार ‘हे’ 5 महत्त्वाचे आर्थिक बदल !!!