Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भरपूर पैसे कमवण्यासाठी शेअर बाजार हा देखील एक मार्ग आहे. शेअर बाजारामध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मजबूत नफा कमावता येतो. मात्र, यासाठी गुंतवणूकदारांकडे संयम असणे खूप महत्त्वाचे ठरते. सहसा दीर्घकाळासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळतो. नवरत्न कंपनी Bharat Electronics Ltd या कंपनीचे शेअर्स देखील असेच आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकावधीमध्ये मजबूत नफा मिळाला आहे. गेल्या 23 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने तब्बल 45,627 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना आता करोडो रुपये मिळाले असतील.

Multibagger alert! This Tata Group stock doubled shareholder's money in  2021 - BusinessToday

हे लक्षात घ्या कि, NSE वर मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्क्यांनी वाढून 100.70 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या कंपनीकडून गुंतवणूकदारांना आतापर्यंत 3 वेळा बोनस शेअर्स देखील जारी केले गेले आहेत. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्समध्ये सुमारे 39 टक्क्यांनी तर गेल्या एका वर्षात सुमारे 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock

गुंतवणूकदार झाले मालामाल

1999 मध्ये जर एखाद्याने यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याला 4,54,545 शेअर्स मिळाले असतील. तसेच जर गुंतवणूकदाराने हे शेअर्स आत्तापर्यंत राखून ठेवले असतील तर आज हे शेअर्स वाढून 44,99,994 झाले असतील. या मागील कारण असे कि, गेल्या 23 वर्षांच्या कालावधीमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 3 वेळा बोनस शेअर जारी केले आहेत. Multibagger Stock

MULTIBAGGER STOCK 2021: This stock has doubled investors' money in nine  trade sessions | Zee Business

हे लक्षात घ्या कि, 14 सप्टेंबर 2015 रोजी पहिल्यांदा कंपनीने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते. यानंतर 28 सप्टेंबर 2017 रोजी या कंपनीने पुन्हा 1:10 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले आहेत. तिसऱ्या आणि शेवटच्या वेळी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले. तसेच आजच्या किंमतीनुसार 100.70 रुपये प्रति शेअर मोजले तर गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपयांची व्हॅल्यू आज 45 कोटी रुपये झाली असेल. Multibagger Stock

Multibagger stock: ₹1 lakh becomes ₹10 crore in 20 years in this bank share  | Mint

चांगल्या वाढीची क्षमता

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, Ashika Stock Broking Limited ने सांगितले की, “BEL ही नवरत्न PSU कंपनी आहे. जिचा बाजारातील हिस्सा 50% पेक्षा जास्त आहे. ही कंपनी लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा एक प्रमुख पुरवठादार आहे. तसेच आता डिफेंस सेक्‍टरमधील आयात कमी करण्यावर सरकारने भर दिला आहे. ज्यामुळे आगामी काळात BEL चा व्यवसाय आणखी वाढण्याची शक्यता आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=BEL

हे पण वाचा :
Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले
‘या’ Post Office योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा 2500 रुपये
New Business Idea : टोमॅटो केचपच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Indian Overseas Bank च्या ​​FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या