Multibagger Stock : ग्लास कंटेनर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock हे कमी कालावधीमध्ये जास्त नफा कमावून देतात. ज्यामध्ये गुंतवणूक करून लोकांना कमी वेळेत मोठा नफा मिळू शकतो. मात्र हे स्टॉक मोठा रिटर्न जरी देत असले तरीही त्यामध्ये पैसे गुंतवणे धोक्याचे देखील असते. जर योग्य वेळी पैसे गुंतवले गेले तर मोठा नफा अन्यथा मोठे नुकसानही सोसावे लागू शकते. मात्र, शेअर बाजारात असेही काही स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. Agi Greenpac चे शेअर्स देखील त्यांपैकीच एक आहेत.

Multibagger alert! This Tata Group stock doubled shareholder's money in  2021 - BusinessToday

हे जाणून घ्या कि, Agi Greenpac ही देशातील ग्लास कंटेनर बनवणार्‍या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घकालावधीमध्ये चांगला मिळवून रिटर्न दिला आहे. मात्र, यापूर्वी केअर रेटिंगच्या रिव्यूनंतर, या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली आहे. आज हे शेअर्स दोन टक्क्यांहून जास्तीच्या घसरणीने रेड मार्कवर बंद झाले आहेत. Multibagger Stock

28 रुपये से 7100, केवल इस शेयर में लगा देते पैसा, तो आज होते करोड़पति! -  Best Multibagger Stocks If you Invested in this Stock You would have been  crorepati tutd - AajTak

गुंतवणूकदार झाले मालामाल

गेल्या 20 वर्षात या शेअर्सनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत. या शेअर्सने गेल्या 20 वर्षात 17,055.94 टक्के रिटर्न दिला आहे. शॉर्ट टर्ममध्ये या झाली असली तरीही दीर्घकालावधीमध्ये या शेअर्सने बंपर रिटर्न दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत यामध्ये 3 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच गेल्या, गेल्या एका वर्षामध्ये त्याने 15 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, गेल्या पाच वर्षांत, या शेअर्सने गुंतवणूकदारांना 238 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Multibagger stocks: Invest Rs 1 lakh and earn Rs 79 lakh in a year, here's  how

एक लाख रुपये झाले दोन कोटींहून जास्त

मार्च 2003 मध्ये, 1.32 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आज 300 रुपयांच्या पातळीवर आहेत. त्यावेळी जर एखाद्याने यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याचे 2,62,000,00 रुपये झाले असतील. म्हणजेच गेल्या 20 वर्षात हे शेअर्स 262 पटींनी वाढले आहेत. Multibagger Stock

HSIL Limited has changed its name to AGI Greenpac

कंपनी बाबत जाणून घ्या

1981 मध्ये ‘द असोसिएटेड ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेड’ (AGI) चे अधिग्रहण करून Agi Greenpac ने ग्लास कंटेनर व्यवसायात प्रवेश केला. ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या काचेच्या कंटेनर उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच या कंपनीकडे डाउनस्ट्रीम क्षेत्रात विविध इंधन पर्याय आणि प्रोडक्ट एप्लिकेशन वापरण्याची क्षमता आहे. 2011 मध्ये गार्डन पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड (GPPL) च्या अधिग्रहणाद्वारे Agi Greenpac ने PET बाटल्यांच्या निर्मितीमध्ये क्रांती घडवून आणली. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=AGI

हे पण वाचा :
Ramgad : रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला, याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या
Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या
Gold Loan : आपले दागिने दूर करतील पैशांची समस्या फक्त करावे लागेल ‘हे’ काम
शिक्षणासाठी ‘या’ सरकारी बँकांकडून सर्वात कमी व्याजदराने मिळेल Education Loan
खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया