व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबई -आग्रा महामार्गावर भीषण अपघात!! भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला अन्….; 12 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. आज मुंबई- आग्रा महामार्गावर पळासनेरजवळ एक कंटेनर भरधाव वेगात हॉटेलमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत तब्बल 12 लोकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आज दुपारी 12 वाजता हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेनंतर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दुपारी बाराच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळून एक कंटेनर जात होता. या दरम्यान अचानक कंटेनरचा ब्रेक झाल्याने भरधाव वेगात तो जवळच असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. हॉटेलबाहेर अनेक वाहने उभी होती. मात्र त्या सर्व वाहनांना तुडवतच हा कंटेनर हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात १२ लोकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झालेत.

या भीषण अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिक लोकांनी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु केलं आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.