Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 12 स्थानकांची नावे समोर; पहा कसा असेल रूट

Mumbai Ahmedabad Bullet Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Ahmedabad Bullet Train । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. बई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकांची नावे समोर आली आहेत. मुंबई ते अहमदाबाद हा ५०८ किलोमीटर लांबीचा हा प्रवास महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा- नगर हवेलीमधून केला जाईल. या बुलेट ट्रेनचा रूट मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपासून सुरू होतो तर अहमदाबादमधील साबरमती येथे शेवटचं स्टेशन आहे. यादरम्यान हि बुलेट ट्रेन ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा , सुरत ,भरूच आणि वडोदरा येथे थांबेल.

या १२ स्टेशनवरून धावणार बुलेट ट्रेन– Mumbai Ahmedabad Bullet Train

मुंबई (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स): हे बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन असेल

ठाणे: ठाणे येथील स्टेशन डोंबिवली पूर्वेजवळ प्रस्तावित आहे

विरार: पालघर जिल्ह्यात असलेल्या विरार मधून बुलेट ट्रेन जाईल. हे महाराष्ट्रातील तिसरे स्टेशन असेल.

बोईसर: विरार यानंतर पुढचे स्टेशन (Mumbai Ahmedabad Bullet Train) असेल ते म्हणजे भोईसर…

वापी: वापी गुजरातमधील पहिले स्टेशन, वापी हे एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे.

बिलीमोरा: नवसारी जिल्ह्यातील या स्टेशन मुळे पर्यटनाला चालना मिळेल.

सुरत: सुरत हे गुजरातमधील एक प्रमुख व्यावसायिक शहर असून याठिकाणी बुलेट ट्रेनसाठी महत्वाचा थांबा असेल.

भरूच: नर्मदा नदीच्या काठावर वसलेले हे स्थानक औद्योगिक विकासाला चालना देईल.

वडोदरा: वडोदरा हे गुजरातचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

आनंद/नदियाड: खेडा जिल्ह्यात स्थित, हे स्थानक कृषी आणि दुग्ध उद्योगांना सेवा देईल.

अहमदाबाद: गुजरातची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या अहमदाबाद येथील बुलेट ट्रेन स्थानक कालूपूरजवळ असेल.

साबरमती: हे मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे शेवटचं स्टेशन असेल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करत म्हंटल होत कि, या बुलेट ट्रेनचे (Mumbai Ahmedabad Bullet Train) पहिले स्टेशन सुरत येथे तयार झालेलं आहे. या बुलेट ट्रेनचे टेस्टिंग पुढील वर्षी सुरू होईल आणि २०२९ पर्यंत पूर्ण सेवा अपेक्षित आहे अशी माहिती संघवी यांनी दिली होती. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मोठा भाग हा गुजरात मध्ये आहे. महाराष्ट्रात या बुलेट ट्रेनचा प्रवास १५६ किमी आहे तर गुजरात मध्ये तब्बल ३४८ किलोमीटर मार्गावर हि बुलेट ट्रेन धावेल. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर आत्तापर्यंत ३०० किलोमीटर लांबीचा व्हायाडक्ट बांधण्यात आला आहे. व्हायाडक्ट ही एक उंच पुलसारखी रचना आहे जी रस्ते, नद्या आणि इतर अडथळ्यांना मात देऊन पुढे जाते. या ३०० किमी पैकी २५७.४ किमी लांबीचे बांधकाम स्पॅन लाँचिंग तंत्र वापरून केले गेले आहे. हे तंत्रज्ञान पारंपारिक पद्धतींपेक्षा १० पट वेगाने काम करते.