Mumbai – Ahmedabad Bullet Train : 350 मीटर लांबीचा पहिला बोगदा तयार; बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्ट (Mumbai – Ahmedabad Bullet Train)के द्रातील मोदी सरकारचा महत्वआकांशी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या माध्यमातून देशातील दोन महत्वाच्या शहरांना जलद गतीने जोडणारा महत्वपुर्ण मार्ग ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर जलदगतीने काम सुरु असून या रेल्वेमार्गा दरम्यान असणाऱ्या पहिल्या डोंगराळ भागातील भुयारी मार्गाचे काम रेकॉर्ड वेळेत पुर्ण करण्यात आले आहे.

एकूण 350 मिटरचे भुयार

बुलेट ट्रेन मार्गातील ही पहिले भुयार गुजरात राज्यातील वलसाड मधील जारोली गावापासून 1 km अंतरावर आहे. संपूर्ण भुयार हे 350 मीटरचे असून 12.6 मीटरच्या व्यासाच्या आकारात खोदण्यात आलेली आहे. तसेच भुयाराची एकूण उंची ही 10.25 मीटर आहे. हा बोगदा घोड्याच्या खुराच्या आकाराचा ( Horse shoe shape) असून भुयारातून बुलेट ट्रेन साठी दोन ट्रॅक बनवण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन साठी बनवण्यात आलेले हे भुयार न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग मेथड ( NATM ) हे तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आले आहे.

वेळेच्या आधी काम केले पूर्ण

संपूर्ण भुयारीकरणाचे काम 10 महिन्याच्या रेकॉर्ड वेळेत पुर्ण करण्यात आले आहे. सदर भुयार हे बुलेट ट्रेनच्या मार्गातील पहिले डोंगरी भुयार असून बुलेट ट्रेन संपूर्ण मार्गात एकूण 7 डोंगरी भुयार बनवण्यात येणार आहेत. तसेच ठाणे ते मुंबई ( BKC ) दरम्यान 21 KM लांबीचे समुद्री भुयार या मार्गात असेल.

एकूण किती खर्च

मुंबई – अहमदाबाद हाय-स्पीड बुलेट ट्रेन (एमएएचएसआर बुलेट ट्रेन) प्रकल्प हा ५०८.१७ किमीचा हाय स्पीड रेल्वे मार्ग आहे जो मुंबई, महाराष्ट्राला अहमदाबाद, गुजरातसह १२ स्थानकांद्वारे जोडेल आणि अंदाजे रु. 1.1 लाख कोटी खर्च यासाठी अपेक्षित आहे.