Mumbai Ahmedabad Bullet Train बाबत सर्वात मोठी अपडेट; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव नेमकं काय म्हणाले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train) कडे सर्वांचे लक्ष्य आहे. या ट्रेनची घोषणा झाल्यापासूनच अनेक कारणांनी ती चर्चेत आली होती. आता या बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात सुद्धा झाली असून देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. मुंबई ते अहमदाबाद ला जोडणारा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्पमधील बिलीमोरा आणि सुरत दरम्यानचा मार्ग 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रवासाला गती मिळणार आहे.

या प्रकल्पाबाबत बोलताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 21 नोव्हेंबरदरम्यान (Mumbai Ahmedabad Bullet Train) बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 251.40  किलोमीटर अंतराचे पिलर बनवण्यात आले आहेत. तर 103.24  किलोमीटरचं सुपर स्ट्रक्चर देखील तयार झालेले आहे. हा कामाचा टप्पा एकूण 50 किलोमीटरचा असून याबाबत पुढचे कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

किती असेल बुलेट ट्रेनचा वेग? Mumbai Ahmedabad Bullet Train

बुलेट ट्रेन ही मुंबई आणि अहमदाबाद या दोन प्रमुख शहरांना जोडली जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ही 508 किलोमीटर एवढी आहे. तर ट्रेनचा कमाल ताशी वेग हा 320 किलोमीटर एवढा असणार आहे. या वेगामुळे एवढे अंतर कापण्यासाठी 2 तास 7 मिनिटे लागणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रात बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी चार स्थानकं असतील.

कवच यंत्रणेचे काम 2016 पासून सुरु आहे

कवच यंत्रणेबद्दल बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की सध्या कवच यंत्रणेच्या नेटवर्क निर्मितीचे काम ही 1500 किलोमीटर प्रतिवर्ष असे आहे. रेल्वेच्या सुरक्षेसाठी तसेच समोरासमोर होणाऱ्या रेल्वे अपघातासाठी या कवच यंत्रणेची  निर्मिती करण्यात येत आहे. ओडिशामध्ये बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात तब्ब्ल 300 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ही पावले उचलण्यात येत आहेत. कवच यंत्रणेचे काम हे 2016 पासून सुरु करण्यात आले आहे. तर त्याच्या चाचण्या, प्रायोगिक कार्य आणि बदल हे 2020 पर्यंत करण्यात आले. तर 2022 पर्यंत याची स्थापना आणि उत्पादन मोठ्याप्रमाणात करण्यात आले आहे.

2022 -23 मध्ये रेल्वेने दिली 640 कोटी प्रवाश्यांना सेवा

रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, भारतात कोविड पूर्वीच्या तुलनेत रेल्वेची निर्मिती मोठ्याप्रमाणात झाली आहे. यात 2022 -23 मध्ये रेल्वेने तब्बल 640 कोटी प्रवाश्यांना सेवा दिली आहे. तर २०२३ -24 मध्ये ही संख्या 750 कोटी एवढी करण्याचे लक्ष आहे.