Mumbai Ahmedabad Bullet Train Ticket Price : बुलेट ट्रेनचं तिकीट किती? कधीपासून सुरु होणार? रेल्वेमंत्र्यांनी सगळंच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Ahmedabad Bullet Train Ticket Price : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. देशातील पहिलीच बुलेट ट्रेन असल्याचे देशवासीय आतुरतेने या बुलेट ट्रेनची वाट बघत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सातत्याने बुलेट ट्रेनच्या कामाबद्दल माहिती देत असतात. बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं आहे?? याबाबत ते अपडेट्स देत असतात. आता तर मुंबई- अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं? कधीपासून ती सुरु होईल आणि तिकीट दर किती असेल याबाबत सगळंच सांगून टाकलं आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल, मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरसाठी 8 नद्यांवर पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे 1,08 लाख कोटी रुपये आहे. यापैकी 10 हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करत आहे. तर महाराष्ट्र आणि गुजरात सरकार प्रत्येकी ५ हजार कोटी रुपयांचा खर्च करतील. बाकी उर्वरित राहिलेले पैसे जपानकडून कर्जाच्या स्वरूपात घेतलेले आहेत. त्याचा व्याजदर फक्त ०.१ टक्के आहे. तुम्हाला हवे असल्यास सुरतमध्ये नाश्ता करा आणि मग मुंबईला जाऊन काम करा. यानंतर, तुम्ही रात्री पुन्हा तुमच्या कुटुंबाकडे परत येऊ शकता असंही रेल्वेमंत्रानी सांगितलं.

भाडं किती असेल – Mumbai Ahmedabad Bullet Train Ticket Price

दरम्यान, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे ३ हजार रुपये असण्याची शक्यता एका अहवालात वर्तवण्यात आली आहे. विमानापेक्षा बुलेट ट्रेनच्या किमती (Mumbai Ahmedabad Bullet Train Ticket Price) कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘जगात जिथे जिथे बुलेट ट्रेन धावत आहेत, तिथे ९० टक्के लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बुलेट ट्रेनचा वापर करत आहेत. मुंबई ते अहमदाबॅड बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई, ठाणे, वापी, बडोदा, सुरत, आनंद आणि अहमदाबादची अर्थव्यवस्था एक होईल असेही अश्विनी वैष्णवी यांनी सांगितलं.