मुंबई 26/11 हल्ला प्रकरणातील वकील उज्ज्वल निकम यांनी राकेश मारिया यांचा दावा फेटाळला; म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ला खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माजी मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या ‘पाकिस्तानी अतिरेकी हिंदू दहशतवाद दाखवण्याच्या षडयंत्राखाली आले होते’ या दाव्याला फेटाळले आहे. उज्ज्वल निकम यांच्या म्हणण्यानुसार 10 दहशतवाद्यांपैकी 9 दहशतवाद्यांनी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या ओळखपत्रांवर स्वतःची हिंदू नाव लिहिली होती.

निकम म्हणाले की, “अजमल कसाबकडे जे ओळखपत्र मिळालं होत त्यावर समीर चौधरी हैदराबाद असं नाव लिहिले गेले होते हे खरे आहे परंतु ते बनावट होते. पोलीस तपासात ओळखपत्रावर ज्या महाविद्यालयाचा उल्लेख होता त्याच्या प्राचार्यांनी न्यायालयात याबाबत खुलासा करत साक्ष दिली होती. परंतु बनावट नावाचे ओळखपत्र हल्ल्यापूर्वी तयार केलं असून पकडले गेले असता हल्ल्याचा डाव लपविण्याच्या उद्देशाने त्याने हे केले होते. जेणेकरुन पकडल्यावर ते स्वत: ला भारतीय आणि विद्यार्थी म्हणून सांगू शकतील. माझ्या मते बनावट ओळखपत्र तयार करण्यामागे त्यांचा हाच हेतू होता.”

निकम म्हणाले की, “मी राकेश मारियाशी फोनवरही बोललो आहे. ते असेही म्हणतात की, मी असे काही लिहिले नाही. मी लिहिले आहे की जर अजमल कसाबला जिवंत पकडले गेलं नसत तर दहशतवादी हिंदू दहशतवाद दाखवण्यास आले होते अशी हेडलाईन दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात आली असती.”

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.