Mumbai Blast Threat Message : मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेत; धमकीच्या मेसेजने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Blast Threat Message । देशाची आर्थिक राजधानी मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईत ६ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेत असा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. एका अज्ञात क्रमांकावरुन हा धमकीचा मेसेज आला असून पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची ही पहिलीच धमकी नाही, यापूर्वी सुद्धा अनेकदा असे धमकीवजा कॉल किंवा मेसेज पोलिसाना देण्यात आले आहेत.

धमकीच्या मेसेज मध्ये नेमकं काय म्हंटल – Mumbai Blast Threat Message

समोर आलेय माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात (Mumbai Blast Threat Message) आल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा मेसेज कोणी पाठवला हे अद्याप कळू शकलेलं नाही मात्र मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. मागील ३-४ महिन्यात अनेकदा असे धमकीचे कॉल मुंबई पोलिसाना आले होते.

पुण्यातही धमकीचा मेसेज –

दरम्यान, याच्या अगोदर पुणे पोलिसांच्या कंट्रोलरुमध्येही असाच प्रकारचा धमकीचा मेसेज आला. पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देऊ असा धमकीचा मेसेज गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमच्या वॉट्सअप नंबरवर आला होता. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून .बॉम्ब शोधक पथके देखील हॉस्पिटल परिसरात तैनात करण्यात आली होती. धमकीचा हा मेसेज करणाऱ्या व्यक्तिचा पोलीस शोध घेत आहेत.