राज्यभरात अनेक महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. राज्यातील लहान शहरांची मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढून औद्योगिकरणाला आणि व्यापाराला चालना मिळावी हा यामागचा उद्देश आहे. रस्ते प्रकल्पाअंतर्गत बोगदे आणि पूल यांची सुद्धा निर्मिती करण्यात येते. अशातच बडोदा जे एन पी टी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा माथेरान डोंगरांमध्ये खोदण्यात आला असून बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा पंधरा महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. त्याची रुंदी ही 22 मीटर आहे तर या बोगदाच्या चार मार्गिका असणार आहेत.
बदलापूर ते पनवेल फक्त 10 मिनिटांत
या बोगदामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास फक्त दहा मिनिटांमध्ये तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे 30 ते 40 मिनिटांमध्ये करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदर इथून जी वाहन जातील त्यांना बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली वडोदरा महामार्गाला देखील उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. याशिवाय या बोगद्यामुळे सगळ्यात मोठा फायदा पनवेल तसेच तळोजा कल्याण मार्गावर जी काही वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचा ताण येतो तो कमी करण्यासाठी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या बोगदाचा काम सध्या 80% पूर्ण झालं असून या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या बोगदाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात या दुसऱ्या बोगद्याचे काम देखील पूर्ण होण्याची शक्यता असून या दोन्ही बोगदांची मध्यभागांची उंची 13 ते 22 मीटर इतकी आहे
माथेरान डोंगरा खालून दिल्लीचा बोगदा
जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १३५० किलोमीटरच्या दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे च काम सध्या सुरू असून या एक्सप्रेस वे वरील माथेरान डोंगरा खालून दिल्लीचा बोगदा निघणार असून त्यामुळे मुंबईहून 12 तासात दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. दिल्ली ते जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या १३५० किलोमीटरच्या मार्गाचे काम सुरू होणार असून यासाठी माथेरानचा जो काही ईको सेंसिटिव्ह झोन आहे त्या डोंगर रांगांमधून 4.39 किलोमीटरचा आठ पदरी बोगदा लवकरच खोदला जाणार आहे. हा बोगदा पनवेल जवळ माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या मोरबी गावापासून सुरू होणार असून ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ जवळ असलेल्या भोज या गावापर्यंत असणार आहे. साधारणपणे या बोगदासाठी 1453 कोटींचा खर्च होणार आहे व यामुळे दिल्ली ते मुंबई हे 24 तासांचा अंतर निम्म्याने कमी होऊन 12 तासांवर येणार आहे