मुंबईत 22 वर्षीय गोविंदाचा मृत्यू, दोन दिवसांची झुंज अखेर अपयशी, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा (Dahi handi) उत्सव साजरा करण्यात आला. कोरोना असल्यामुळे मागच्या दोन वर्षांपासून दहीहंडी (Dahi handi) साजरी करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचं (Dahi handi) आयोजन करण्यात आलं होतं, पण दहीहंडीच्या (Dahi handi) या उत्सवाला मुंबईमध्ये गालबोट लागला आहे. 22 वर्षांचा गोविंदा संदेश दळवी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
शिवशंभो गोविंदा पथकाचा संदेश प्रकाश दळवी हा विलेपार्लेमध्ये दहीहंडी (Dahi handi) फोडण्यासाठी सातव्या थरावर चढला होता. यावेळी त्याचा पाय सटकला आणि तो सातव्या थरावरून खाली पडला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्याच्या मेंदूला दुखापत झाली होती. यानंतर अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संदेश प्रकाश दळवी याच्या माघारी आई-वडील आणि तीन भावंडं असा परिवार आहे.

दरम्यान क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी गोविंदाच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना संदेश दळवीचा मृत्यू (Dahi handi) ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दोन दिवस त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच्या कुटुंबियांनी त्याला आज नानावटीला नेलं. हा गोविंदा गरीब कुटुंबातील आहे. आम्ही त्याला 10 लाखांची मदत तर देणार आहोतच, पण त्याच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी यावेळी दिले.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर