Mumbai-Delhi Train: मुंबई आणि दिल्लीमधील रेल्वे प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी बातमी! भारतीय रेल्वेने ‘मिशन रफ्तार’ या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत देशातील दोन प्रमुख शहरांमधील अंतर आता केवळ 12 तासांत पार करण्याची तयारी केली आहे. आधी लागणारे 16 तास आता 4 तासांनी कमी होणार असून, ही गती वाढ कोणत्याही अतिरिक्त (Mumbai-Delhi Train) भाड्याशिवाय मिळणार आहे. म्हणजेच, तुमचा वेळही वाचणार आणि खर्चही नाही वाढणार!
‘मिशन रफ्तार’ म्हणजे काय?
‘मिशन रफ्तार’ अंतर्गत भारतीय रेल्वे 160 किमी/तास वेगाने ट्रेन धाववण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. यासाठी दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गाचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, रेल्वे ट्रॅक्स, स्टेशन सुविधा, तसेच ट्रॅफिक व्यवस्थापनात मोठे बदल केले जात आहेत. विशेष म्हणजे, या मार्गावर आता तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन टाकण्याचाही प्लान तयार आहे.
कोठे सुरू आहे काम? (Mumbai-Delhi Train)
कोटा ते नागदा (545 किमी) आणि नागदा ते गोध्रा (228 किमी) या दोन्ही मार्गांवर नव्या लाईन्ससाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
या नव्या लाइन्समुळे प्रवासी व मालगाड्यांमध्ये होणारी टक्कर आणि विलंब टळतील, तसेच अधिक ट्रेन चालवणे शक्य होईल.
सध्या मार्गावरील काही भागांमध्ये 130 किमी/तास वेगाने ट्रेन धावतात. मिशन रफ्तारनंतर संपूर्ण 1,336 किमी मार्गावर 160 किमी/तास वेग मिळणार!
कोणत्या ट्रेन होणार सुपरफास्ट?
वंदे भारत, राजधानी, शताब्दी, दुरंतो, तेजस एक्सप्रेस अशा प्रीमियम ट्रेनना सर्वप्रथम हायस्पीड ट्रॅक्सवर सोडले जाणार.
ट्रॅक पूर्णपणे अपग्रेड झाल्यावर इतर एक्सप्रेस गाड्यांनाही उच्च वेग मिळणार.
यामुळे वेळापत्रकही नवीन वेगानुसार अपडेट होईल, आणि प्रवास अधिक कार्यक्षम बनेल.
‘कवच’ प्रणालीने होणार प्रवास अधिक सुरक्षित
‘मिशन रफ्तार’सोबतच रेल्वेच्या ‘कवच’ सुरक्षा प्रणालीचं काम अंतिम टप्प्यात आहे. ही टक्करविरोधी यंत्रणा यशस्वीरित्या काही विभागांमध्ये चाचणी पास झाली असून, लवकरच संपूर्ण मार्गावर लागू होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण होईल.
रेल्वेच्या ‘मिशन रफ्तार’मुळे भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक ऐतिहासिक भर पडणार आहे. कमी वेळ, तेही नेहमीच्या भाड्यात, आणि सुरक्षिततेची हमी हे सगळं प्रवाशांसाठी मोठं गिफ्टच ठरणार आहे!




