Wednesday, February 1, 2023

मुंबई गोवा महार्गावर विचित्र अपघात; भरधाव ट्रकची सलग पाच वाहनांना धडक

- Advertisement -

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – मुंबई गोवा महार्गावरील परशुराम घाटात एक विचित्र अपघात (accident) घडला आहे. यामध्ये एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिल्यामुळे एक विचित्र अपघात (accident) झाला आहे. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काय घडले नेमके?
प्रत्येक सणासुदीला महामार्गावर ट्रॅफिक जामची समस्या उद्भवत असते. यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई गोवा महार्गावरील परशुराम घाटात असाच एक विचित्र अपघात (accident) घडला आहे. हा अपघात एका मद्यधुंद ट्रक चालकाने बेदकारपणे वाहन चालवल्यामुळे झाला आहे. या ट्रक चालकाने एक – दोन नाहीतर पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात (accident) पाचही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

या अपघातानंतर आरोपी ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघातामुळे (accident) मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त गाड्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे कि गाड्यांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!