Mumbai Goa Highway : गणेशोत्सव 2024 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना आता गावाची वाट दिसू लागली आहे. त्यातही कोकणातल्या रहिवासी आधीच आपल्या रेल्वे बसचे बुकिंग करून ठेवतात. तुम्ही देखील मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सव काळात या महामार्गावरून जडवाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक जाणून (Mumbai Goa Highway) घेऊया…
‘या’ काळात बंदी (Mumbai Goa Highway)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी काही उपाययोजना राबवल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पाच सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते आठ सप्टेंबर रोजी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत हे वाहतूक बंद राहणार आहे तसेच पाच सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन गौरी गणपती विसर्जन परतीचा प्रवास यासाठी 11 सप्टेंबर रात्री आठ ते 13 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत सुद्धा वाहतूक वर बंदी असणार आहेत. तर अनंत चतुर्दशी अर्थात अकरा दिवसांच्या गणवेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आणि त्यानंतरच्या परतीच्या प्रवासासाठी 17 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते 18 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत ही वाहतूक बंदी असणार आहे. दिलेल्या काळामध्ये अवजड वाहनांना या मार्गावरून (Mumbai Goa Highway) प्रवास करता येणार नाही.
आजपासून मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा (Mumbai Goa Highway)
26 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. दुपारी बारा वाजता पळस्पे इथून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीनही जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा नियोजित आहे. मागच्या 14 वर्षापासून या महामार्गाचे काम रखडल्यामुळे कोकणवासी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू असून अनेक ठिकाणी पेवर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचं (Mumbai Goa Highway) काम सुद्धा केलं जात आहे.