मुंबई-गोवा प्रवास होणार सोपा! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं कधी सुरु होणार मार्ग ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यंदा जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. अनेक वर्षे गड्ढ्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या कोकणवासीयांना आणि प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

नितीन गडकरी यांनी मुंबईत ‘वसंत व्याख्यानमाला’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, “मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामात अनेक अडचणी आल्या होत्या, पण त्या आता दूर झाल्या असून जून 2025 पर्यंत 100 टक्के काम पूर्ण होईल.”

काय अडचणी आल्या?

गडकरींनी स्पष्ट केलं की, “भाऊ-बंधुंमधील वाद, कोर्टात सुरू असलेले खटले आणि जमिनीच्या भरपाईबाबत निर्माण झालेली गुंतागुंत यामुळे प्रकल्पाला विलंब झाला. मात्र आता सर्व अडथळे दूर करण्यात आले असून काम वेगात सुरू आहे.”

कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा

या महामार्गामुळे मुंबई आणि गोवा यामधील अंतराचा प्रवास वेळ कमी होणार असून, पर्यटन आणि स्थानिक विकासालाही चालना मिळणार आहे. दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना जलद, सुरळीत आणि सुरक्षित रस्ता मिळणार आहे.

लवकरच नवीन टोल धोरण

याच कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “पुढील १५ दिवसांत केंद्र सरकार नवीन टोल धोरण जाहीर करणार आहे. त्यामुळे टोलविषयक नागरिकांच्या तक्रारी संपतील. देशभरातील फिजिकल टोल बूथ हटवले जातील आणि एक आधुनिक टोल प्रणाली लागू केली जाईल.”

“भारतचं रस्ते नेटवर्क अमेरिकेपेक्षा चांगलं होईल!”

गडकरी यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की, “पुढील दोन वर्षांत भारताचं रस्ते बांधकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेपेक्षा अधिक दर्जेदार होईल.
मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प हे केवळ प्रवासाचं नव्हे तर कोकणच्या सर्वांगीण विकासाचं दार उघडणाऱ्या दिशेने मोठं पाऊल आहे. आता सर्वांच्या नजरा जून 2025 कडे लागल्या आहेत – जेव्हा अखेर या महामार्गाचं पूर्ण रूप समोर येणार आहे.