बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी दिली ‘हि’ शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

छत्तीसगड : वृत्तसंस्था – आजकाल तरुण बाईट स्टंट करण्यास अतिउत्साही असतात अशाच एक तरुणाचा उत्साहपणा छत्तीसगडच्या पोलिसांनी (durg police) उतरवला आहे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक तरुण दोन्ही पाय एका बाजूला करून मोटरसायकल चालवत आहे. एवढेच नाही तर त्यांनी मोटरसायकलचे हँडल देखील एका हातानेच पकडले आहे. तर दुसरीकडे हँडल वर त्याचा मोबाईल देखील दिसत आहे. हा 28 सेकंदाचा व्हिडिओ पाहून सध्या नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांनी (durg police) याला चांगलीच अद्दल घडवली आहे.

दुर्ग पोलिसांनी (durg police) आपला अधिकृत ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी या पठ्ठ्याला चार हजार दोनशे रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. यानंतर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता तो तरुण कान पकडून माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे.

हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार